राजगड न्युज नेटवर्क
भोर: वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी साताऱ्यात या ठिकाणी सभा आयोजित केली होती. त्यानुसार पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ या ठिकाणी भोर तालुक्यातील सर्व आंबेडकर प्रेमींनीकडून जंगी स्वागत करण्यात आले.
प्रकाश आंबेडकर यांचा सातारा दौरा होता त्यानुसार कापूरहोळ या ठिकाणी भोर तालुक्यातील आंबेडकर प्रेमींनी प्रकाश आंबेडकर यांचे स्वागताचे आयोजन केले होते यावेळी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक उपस्थित होते.प्रकाश आंबेडकर यांनी कापूरहोळ या ठिकाणी भेट घेत आपल्या कार्यकर्त्यांना सुखद धक्काच दिला .सर्व कार्यकर्त्यांकडून हार,फुले, डिजे यांच्या साह्याने स्वागत करण्यात आले.आजचा दिवस हा भोर तालुक्यातील आंबेडकरी समाजासाठी एक इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल. वंचितांचे कैवारी, बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे पवित्र चरण आज पुण्यनगरी भोर येथे पहिल्यांदा लागले. या क्षणाचे पूर्ण श्रेय हे आपल्या सारख्या आंबेडकर घराणे प्रेमी कार्यकर्त्यांनाच जाते… बाबासाहेब यांना पाहता नाही आले पण आज तुमच्या माध्यमातून बाळासाहेब यांना तरी पाहता आले अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी सागर जगताप,मिलिंद जगताप,रुपेश जगताप , रोहित जगताप,अरुण रणखांबे , रणजित रणखांबे,मयूर गायकवाड,नितीन माने ,विनोद गायकवाड, सतिश अडसूळ,अक्षय गायकवाड, अमर माने, आकाश कांबळे,कुणाल कांबळे, आनंद खुडे, प्रकाश ओव्हाळ,अंकुश साळुंखे,सुरज शेलार, योगेश चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.