भोर | प्रतिनिधी : भोर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची नवीन प्रभाग रचना निश्चित करणारा प्रारूप मसुदा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिनांक १४ जुलै २०२५ रोजी अधिकृतपणे जाहीर केला आहे. या मसुद्यानुसार भोर तालुक्यातील एकूण ४ जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गणांची रचना ठरवण्यात आली असून, नागरिकांना या मसुद्यावर हरकती व सूचना २१ जुलै २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हा मसुदा राज्य शासनाच्या १२ जून २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्टपणे सूचित केले आहे की, हरकती व सूचना वेळेत प्राप्त झाल्यासच त्यांचा विचार केला जाईल. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
प्रभागांतील गट व गावांची यादी पुढीलप्रमाणे:
1. वेळू – नसरापूर जिल्हा परिषद गट
वेळू पंचायत समिती गण: शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू, कासुर्डी खे.बा., रांजे, कुसगाव, खोपी, शिवरे, वर्वे खु., वर्वे बु., कांबरे खे. बा., कांजळे.
नसरापूर पंचायत समिती गण: करंदी खे. बा., देगाव, नायगाव, केळवडे, साळवडे, कुरंगवडी, पारवडी, सोनवडी, सांगवी बु., कोळवडी, जांभळी, विरवाडी, केतकावणे निम्मे, दिडघर, कामथडी, खडकी, उंबरे, सांगवी खु., निधान, माळेगाव, नसरापूर.
2. भोंगवली – संगमनेर जिल्हा परिषद गट
भोंगवली पंचायत समिती गण: निगडे, धांगवडी, किकवी, मोरवाडी, वागजवाडी, भोंगवली, पेंजळवाडी, टापरेवाडी, गुणंद, वाठार हिंगे, न्हावी ३१५, न्हावी ३२२, भांबवडे, राजापुर, पांडे, सावरदरे, सारोळे, केंजळ.
संगमनेर पंचायत समिती गण: तांभाड, हातवे खु., हातवे बु., भिलारेवाडी, मोहरी बु., हरिशचंद्री, दिवळे, कापुरव्होळ, मोहरी खु., तेलवडी, कासुर्डी गु. मा., आळंदे, भैरवनाथनगर आळंदेवाडी, इंगवली, संगमनेर, हर्णस, लव्हेरी, नन्हे, ब्राम्हणघर वेखो, माजगाव जोगवडी, गोरड म्हसवली.
3. भोलावडे – शिंद जिल्हा परिषद गट
भोलावडे पंचायत समिती गण: वाढाणे, करंदी बु., करंदी खु., कांबरे खु., कांबरे बु., कुरुंजी, मळे, गुहिणी, खुलशी, कुंबळे, बोपे, चांदवणे, भुतोंडे, डेरे, भांड्रवली, साळंगण, डेहेण, कोंडगाव, पांगारी, नानावळे, जयतपाड, नांदघूर, वेळवंड, राजघर, पसुरे, म्हाळवडी, कर्णवडी, बारे बु., बारे खु., किवत, बसरापूर, भोलावडे, सांगवी हिमा, येवली.
शिंद पंचायत समिती गण: गवडी, शिंद, नांद, महुडे खु., ब्राह्मणघर हिमा, महुडे बु., भानुसदरा, पिसावारे, वाठार हिमा, नांदगाव, आपटी, करंजगाव, निगुडघर, देवघर, म्हसर खु., म्हसर बु., कोंढरी, हिर्डोशी, धामूनशी, वारवंड, कारुंगण, शिळींब, कुंड, राजिवडी, आशिंपी, शिरगाव, दुर्गाडी, अभेपुरी, शिरवली हिमा, कुडली खु., कुठली बु., गुढे, निवंगण, प-हर खु., माझेरी, प-हर बु., धनिवली, दापकेघर.
4. उत्रोली – कारी जिल्हा परिषद गट
उत्रोली पंचायत समिती गण: शिरवली तर्फे भोर, पोंम्बर्डी, वेनवडी, भाबवडी, हातनोशी, बाजारवाडी, धावडी, पळसोशी, पाले, वरोडी बु., वरोडी डायमुख, वरोडी खु., आंबाडे, कोळवडी, बालवडी, नेरे, निळकंठ, गोकवडी, खानापूर, उत्रोली, वडगाव डाळ.
कारी पंचायत समिती गण: रायरी, भांबट माळ, साळव, भावेखल, अंगसुळे, सांगवी तर्फे भोर, कारी, कोर्ले, टीटेघर, वडतुंबी, शिवनगरी, म्हकोशी, चिखलगाव, आडाचीवाडी, धोंडेवाडी, रावडी, कर्णावड, कुडपणेवाडी, वावेघर, आंबवडे, नाझरे, पान्हवळ, चिखलावडे बु., चिखलावडे खु., आंबेघर, नाटंबी, करंजे.
हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख: २१ जुलै २०२५
नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना लिहून जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पोहोचतील अशा पद्धतीने सादर कराव्यात, अन्यथा त्या विचारात घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.