राजगड वृत्तसेवा
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे काल (गुरुवारी) बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. शर्यत सुरू झाल्यानंतर बैलगाडीवरील नियंत्रण सुटलं यामुळे मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये २१ लाख रुपयांचा बैल जागीच ठार झाला आहे. तर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील शिवरी या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती यावेळी बैलगाडी धावपट्टी सोडून धावत होती. सुसाट वेगात धावणारी ही बैलजोडी थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना इतकी भयानक होती, की यात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या बैलाची किंमत 21 लाख रूपये होती . तर दुसऱ्या बैलाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं आहे.
एक जण गंभीर जखमी
नियंत्रण सुटलेल्या बैलगाडीला थांबवण्यासाठी गेलेल्या संदीप न्यानोबा कामथे यांच्या अंगावरून बैलगाडी गेली. त्यामुळे या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जेजुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.