नवी दिल्ली- कावेरी नदी पाणीवाटपाच्या मुद्द्यावर बोलताना जेडीएसचे खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. पत्रकार परिषदेत बोलताना देवेगौडा यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं दिसलं. कावेरी पाणीवाटप हा ज्वलंत मुद्दा आहे.देवेगौडा यांनी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. (PM HD Deve Gowda on Cauvery water sharing issue)
कर्नाटक राज्यामध्ये सध्या पाण्याची जी स्थिती आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात एक टीम पाठवावी. मी सध्या राजकारण किंवा सत्तेसाठी जिवंत नाही. आम्ही राज्यातील जनतेला सुखरुप ठेवण्यासाठी येथे आहोत. आमचा पक्ष लोकांच्या कामासाठी आहे, असं ते म्हणाले आहेत. एएनआयने यासंदर्भातील बातमी दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. जल शक्ती मिशन विभागाने पुनरावलोकन याचिका दाखल करावी आणि तज्ज्ञांच्या समितीला पाणी प्रश्न आणि सध्याची शेतीची परिस्थिती याचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटक राज्यात पाठवण्यात यावे. पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात विनंती करण्यात आल्याचं देवेगौडा म्हणाले आहेत.