प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोरपासुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आदर्श गाव बसरापुर(ता.भोर) येथील नागरिकांची पंचायत समिती भोरच्या आरोग्य विभागाकडुन साथींच्या आजारांवर गुरुवार (दि.२६) तपासणी करण्यात आली.
सध्या पावसाचा हंगाम संपला असुन ऑक्टोबर हीट व बोचरी थंडी असे हवामान झाले आहे. सकाळी कधी दाट धुके, कडक थंडी, दुपारी कडक ऊन , उकाडा,गर्मी तर सायंकाळी रात्री पुन्हा थंड हवा अशा अमुलाग्र बदलाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे साथींच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्ये सर्दी, खोकला, ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, उलट्या असे आजार बळावले आहेत. तालुक्यातील बसरापूर हे गाव नदी किनारी असल्याने या गावामध्ये व्हायरल इन्फेक्शन होऊन अशा प्रकारचे रूग्ण गावात दिसताच बसरापुर गावच्या विद्यमान महिला सरपंच निलम झांजले यांनी भोर पंचायत समिती आरोग्य विभागास कळविताच , आरोग्य विभागाकडून त्वरित यांची दखल घेऊन आरोग्य अधिकारी, सेवकांमार्फत गावातील लहान मुले, महिला -पुरुष, जेष्ठ नागरिक यांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. गावातील लहान मुलांनासह ५० महिला पुरुषांची तपासणी केली. यावेळी आरोग्य सहाय्यक जी.टी.फूटाणे, जे बी खुडे व आरोग्य सेवक के व्ही जगताप हे उपस्थित होते. हवेत होणाऱ्या बदलांमुळे व व्हायरल इन्फेक्शन मुळे नागरिक आजारी पडत आहेत काहींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यांना औषधे देऊन योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले आहे.
सध्या आशा सेविकांचा बेमुदत संप सुरू आहे , त्यामुळे आरोग्य विभागाला स्वतः जाऊन गावातील लोक आजारी आहेत याची माहिती दिली,या माहितीची त्वरित दखल घेऊन आरोग्य विभागाकडून गावातील नागरिकांची योग्य तपासणी करून औषधे वाटप केलीत तसेच साथीचे आजार व रोगराई बाबत मार्गदर्शन केले.
*निलम संतोष झांजले* – *विद्यमान सरपंच बसरापुर(ता.भोर)*