दत्तात्रय कोंडे
खेड – शिवापूर (वार्ताहार) दि.16 :-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव, धनगर वस्ती ता.भोर तसेच शिवगंगा माध्यमिक विद्यालय कुसगाव तालुका भोर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कुसगाव विद्यालयाच्या प्रांगणात आठवडे बाजार व बाळ गोपाळ मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञानाचे कौशल्य विकसित होण्यासाठी विद्यालयाच्या प्रांगणात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, खाऊची दुकाने तसेच वेगवेगळ्या खेळांची दुकाने लावण्यात आली होती .याप्रसंगी प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षिका आणि मुलांनी केलेल्या स्टॉलला भेट देण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा भालघरे ,पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष दीपक तांबट, शिवाजीराव कोंडे पाटील पुरुषोत्तम तांबट, विठ्ठल चौधरी,सचिन कामठे, माऊली शेडगे ,सिद्धार्थ तांबट, लक्षदीप तांबट, कुसगावच्या उपसरपंच सुरेखाताई तांबट, स्वप्नाली भालघरे, शर्मिला भालघरे, मंगल वाशिवले शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट देऊन खाऊचा आस्वाद घेतला व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले .याप्रसंगी केंद्रप्रमुख भानुदास खुटवड सर व अमोल निगडे सर उपस्थित होते .
मेहनत चिकाटी व एकाग्रता या गुणांवर आधारित आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा भालघरे यांनी केले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील गायकवाड सर ,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे तसेच दीपक तांबट , शिवाजीराव कोंडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कडाळे यांनी केले व खांडेकर सर यांनी आभार मानले.