नसरापूर : नवसह्याद्री शिक्षण संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत सामाजिक क्षेत्रात करत असलेले कार्य हे कौतुकास्पद आणि अभिमान वाटणारे आहे असे प्रतिपादन सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी केले.
नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी संचालित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, डिप्लोमा इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट कॉलेज नसरापूरचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण उत्साहात पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, संचालिका सुनंदाताई सुके, उपाध्यक्षा सायली सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, संचालिका सानवी सुके, संचालक सुरज सुके, विश्वस्त बाबुराव (नाना) सुके, इंजिनीअरिंग चे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी, मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ. तानाजी दबडे, औषधनिर्माणशास्त्र चे प्राचार्य डॉ. किशोर ओतारी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य पंकज भोकरे, गुरुकुलचे प्राचार्य किरण पवार उपस्थित होते.
दि. 3 ते 10 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अंतरंग २०२४ मध्ये विविध खेळांच्या स्पर्धेचे व कला गुणदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोदवला. कार्यक्रमात विविध प्रकारची नृत्ये सादर करण्यात आली. वेगवेगळ्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. वार्षिक स्नेहसंमेलनास विद्यार्थी, शिक्षक व असंख्य पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राम घुगे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संयोजक प्रा. भुपेश शुक्ला यांनी उपस्थितांचे आभार मानले.