वाई प्रतिनिधी: सुशील कांबळे
वाई : राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन महिन्यात हॉटेल / ढाब्यांवर कारवाईचा धड़ाका सुरु असतानाच शुक्रवार दि: 06 रोजी शहाबाग फाटा ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल धनश्री येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा भरारी पथकाने रात्री 09.30 च्या वेळी अचानक घाडी टाकून हॉटेल धनश्रीचे चालक तानाजी बापू गायकवाड रा. शहाबाग ता. वाई यास शासनाचा अधिकृत मद्यविक्री परमिटरुम बिअरबार परवाना नसताना ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्याचे विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनील चव्हाण संचालक , विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन महिन्यात हॉटेल / ढाब्यांवर कारवाईचा धड़ाका सुरु असतानाच शुक्रवार दिनांक06/10/2023 रोजी मो. शहाबाग फाटा ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल धनश्री येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा भरारी पथकाने रात्री 09.30 च्या सुमारास अचानक घाडी टाकून हॉटेल चालक तानाजी बापू गायकवाड रा. शहाबाग ता. वाई यास शासनाचा अधिकृत मद्यविक्री परमिटरुम बिअरबार परवाना नसताना ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्याचे विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये तसेच सदर हॉटेलमध्ये व हॉटेलच्या परिसरात विना परवाना मद्य सेवन केल्याबद्दल
श्रेयस सुभाष सावंत वय 26 वर्षे रा. साकीनाका पोलीस लाईन, मुंबई , दत्तात्रय आनंदा वाडकर वय 31 वर्ष, दिग्विजय शांताराम वाडकर वय 23 वर्षे , अभिषेक अशोक गायकवाड वय 21 वर्षे ,वैभव लक्ष्मण वाडकर वय 29 वर्ष, मयुर महादेव वाडकर वय 24 वर्षे सर्वण राहाणार वयगांव ता. वाई जि. सातारा,ओमकार सुरेश दुधाणे वय 24 वर्षे, राहुल उर्फ आशिष सुभाष दुधाणे वय 24 वर्ष, सुमित भरत दुधाने वय 28 वर्षे ,अमर संतोष दुधाने वय 26 वर्षे सर्वजण राहणार खिंगर ता. महाबळेश्वर जि. सातारा यांचे विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हयात संशयितांच्या ताब्यातून टेबले, खुर्च्या, विविध ब्रँडच्या विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण 6,585/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये सर्वश्री निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, सोमनाथ माने, सहा. दु निरीक्षक महेश मोहिते, जवान सागर आवळे, अरुण जाधव, आबासाहेब जानकर यांनी सहभाग घेतला.
मागील दोन महिन्यात ८० जणांवर कारवाई
मागील दोन महिन्यात या विभागाकडून जिल्हयातील एकूण 10 हॉटेल/धाब्यांवर छापे टाकून 80 जणांविरुदध कारवाई करण्यात आली असून हॉटेल मालक व विना परवाना पिणा-यांकडून मा.न्यायालयाने एकूण 1,14,000/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कायदेशीर कारवाई करण्यात येईल
जिल्हयातील हॉटेल, ढाबे व खानावळी मालक / चालक यांना आवाहन करण्यात येते की, शासनाच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती शिवाय ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था करुन देवू नये किंवा अशा प्रकारच्या जागेवर देखरेख, नियंत्रण ठेवून कोणत्याही रितीने सहाय्य करु नये तसेच मद्यपी ग्राहकांनी सुद्धा शासनाच्या परमीटरुम बिअर अनुज्ञप्ती शिवाय इतरत्र कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करु नये अन्यथा महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निर्देश श्रीमती किर्ती शेडगे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.