सुशील कांबळे : राजगड न्युज
वाई : मांढरदेव देवस्थानने पाणी व्यवस्थापन प्रक्रिया ही जाणीवपूर्वक सदोष पद्धतीने राबवली असल्याने मार्च – एप्रिल मध्ये पडलेल्या अवकाळी पाऊसात खाजगी जागेतील देवीच्या प्रसादाचे दुकानाचा मोठा भाग वाहुन गेल्याने अर्जुन काळू कांबळे या मागासवर्गीय दुकानदारांने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्यावर अट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
अर्जुन कांबळे हे गेली काही महिने न्याय मिळवा यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करीत आहेत माञ कोणीही त्यांना दाद देत नसल्याने कांबळे यांनी सोमवारी ( दि. २५ ) जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे.
याबाबत त्यानी आपल्यावर जाणीवपूर्वक केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला आहे. कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मंदिर परिसरात माझी खाजगी मालकीची जागा असुन त्याचं छोट्या जागेत माझे अनेक वर्षापासून देवीचा प्रसादा , फोटो व अन्य साहित्य असलेले दुकान आहे. दुकानातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अन्य उपजीविकेचे साधन नसल्याने याचं दुकानावर माझ व कुटुंबाचं जीवन अवंबून आहे. निवेदनात कांबळे यांनी देवस्थानने कशा प्रकारे त्रास दिला आहे याबाबतकाही मुद्दे उपस्थित केले आहेत. माझं दुकान खाजगी जागेत असल्याची माहिती देवस्थानाला असतानाही आणि तीव्र उतारावरून येणाऱ्या पाऊसाच्या पाण्यामुळे माझ्या दुकानाचे नुकसान होणार आहे याची कल्पना असताना देखील पाण्याची निचरा करण्याची व्यवस्था ही माझ्या दुकानाला लागुन पाठी मागुन केली आहे. मांढरदेवी देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात आलेल्या अशाप्रकारच्या सदोष व्यवस्थापनामुळे मार्च आणि एप्रिल दरम्यान पडलेल्या अवकाळी पावसात माझ्या दुकानामागील भाग पूर्णपणे वाहून गेला आहे. परिणामतः माझ्या उपजीवीकेचे साधन पूर्णतः उध्वस्त झाली आहे.
ट्रस्टच्या या सदोष पाणी व्यवस्थापनाबाबत वारंवार देवस्थान ट्रस्ट मांढरदेव यांच्याशी संपर्क साधला. परंतु दलित समुदयाचा घटक असल्याने कोणत्याही स्वरुपाची आतापर्यंत दखल घेतली नाही. मांढरदेव देवस्थान ट्रस्टने जाणीवूर्वक माझ्या मालमत्तेचे तसेच मुलभुत हक्काचे देखील उल्लंघन केले आहे. त्यामुळे सदरील मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तसेच सर्व विश्वस्त यांच्यावर अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयान्वये आणि भारतीय दंड संहिता अनुच्छेद ४४७ अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करणेत यावा. अशी मागणी कांबळे यानी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
संबधित निवेदनाच्या प्रती कांबळे यांनीअनुसूचित जाती आयोग, न्याय व विधी विभाग, गृहमंत्री ,पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, पोलीस अधिक्षकसो, उपविभागीय अधिकारीसो, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी , वाई यांना पाठवल्या आहेत.
शिस्तभंगाची कारवाई करावी
२७ जूनला पोलीस अधिक्षक यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन समन्वयाने यावर तोडगा काढण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक वाई यांना दिल्या होत्या मात्र वाईच्या पोलिस निरीक्षकांनी स्वरूपाची बैठक अथवा चर्चा केली नाही. देवस्थान ट्रस्टच्या चेअरमनपदी न्यायाधीश असल्याकारणाने जाणीवपूर्वक गुन्हा नोंद केला नाही किंवा समन्वय बैठक घेतली गेली नाही. तसेच पोलीस अधिक्षकांच्या सूचनांचे पालन देखील केले नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक यांच्यावर ही अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये असलेल्या लोकसेवकाच्या कर्तव्याचे उल्लंधन केलेबाबत तात्काळ गुन्हा नोंद करावा आणि पोलीस अधिक्षकांच्या सूचनांचे पालन न केल्याने त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणही कांबळे यांनी केली आहे.