वाई प्रतिनिधी: सुशील कांबळे
वाई : नियमबाह्य कामं करणाऱ्या व उर्मट व उद्धट वागणाऱ्या पसरणी येथील तलाटी संतोष जगताप याच्यावर तत्काल निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आरपीआयने (आठवले गट) प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक तपशील असा की पसरणी येथील एका व्यक्तीच्या वडिलोपार्जित जमीन अनोंदनिकृत नोटरी मृत्युपत्राच्या आधारे वारसदारांना वगळून नोंद का केली ? असा प्रश्न तलाटी जगताप यांना विचारला असता जगताप यांनी प्रश्नाचं उत्तर देण्याऐजी अरेरावीची ,मस्तावल भाषा संतोष जगताप याच्याकडून वापरण्यात आली असल्याने आरपीआयचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
जगताप याच्याकडे अनोंदनीकृत नोंद करण्याचा कायदा शासनाकडून करण्यात आला असेल तर त्याची प्रत आम्हाला मिळावी ही मागणी केली असता ती माझ्याकडे नाही, तहसीलदार याच्याकडून घ्यावी अशी उर्मट भाषा त्याच्या कडून वापरण्यात आली.
आरपीआयचे प्रदेश युवकचे उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी जगताप याची भेट घेऊन केलेल्या नोंदणी बाबत विचारणा केली असता त्यांना ही जगताप याने उर्मट भाषा वापरली. ज्या व्यक्तीला वारसा हक्काने जमिनीचे हक्क हे मिळाले पाहिजेत अशा व्यक्तीवर आपण अन्याय करू नका. सदर व्यक्ती आत्महत्या करेल हा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला असता मला मी काय करायचं तुम्ही सांगायचं नाही भाषा नीट वापरायची अशी उर्मट भाषा स्वप्निल गायकवाड व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केली त्यामूळे संतप्त कार्यकर्ते यांनी जगताप याच्या निलंबनाची मागणी केली आहे.