सुशील कांबळे|राजगड न्युज
वाई : ” सन्मान संविधानाचा ध्यास आरोग्याचा ” हे बिद्र वाक्य घेऊन होणारी चौथी गरवारे वाई मॅरेथॉन स्पर्धा २६ नोव्हेंबरला वाईत होत आहे. आंतररष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा वाईकरासाठी पर्वणी ठरणार आहे. वाई सह जिल्ह्यातील अबाल वृद्धांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगसेवक, मॅरेथॉनचे संघटक दीपक ओसवाल यांनी केले आहे.
ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या वाई शहरात टिम वाई स्पोर्ट्स फाउंडेशन व मांढरदेवी अँथलेटिक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने गरवारे वाई हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी आयोजित केलेल्या तिन्ही वर्षीच्या मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी चौथे पर्व आम्ही घेऊन येत आहोत.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शनिवार पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरूवात होत आहे.दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी वाई हाफ मॅरेथॉनला डेक्कन एज्यु.सोसायटीच्या द्रविड हायस्कुल वाई येथुन सुरूवात होईल.
दरम्यान महागणपती वाई, मराठी विश्वकोष कार्यालय, नाना फडणवीस वाडा व कृष्णा घाट मेणवली, धोम धरण व जलाशय, पांडवगड, कमळगड अशा ऐतिहासिक, धार्मिक वास्तूंचे दर्शन घडवित हिरव्यागार निसर्गरम्य परीसरात सकाळच्या कोवळ्या ऊनात धावण्याचा आनंद अविस्मरणीय असणार आहे.