वाई प्रतिनिधी : सुशील कांबळे
वाई: येथील भाजी मंडईत असेलल्या जुन्या वाड्याला अचानक लाग लागल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी आठवडा बाजार असल्याने मंडईत गर्दी होती. माञ या आगीत कसलही जीवित हानी झाली नाही. अग्निशामक बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मंडईच्या मध्यवर्ती सकुंडे यांचा जुना वाडा आहे. वाड्याचा दर्शनी भाग हा व्यापारी व्यवसायासाठी वापरत आहेत. तर मागील बाजूस सकुंडे व त्याचं कुटुंब वास्तव्याला आहे. सोमवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक वाड्यातून अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने नागरिकांनी पाहिले. त्यानंतर काही वेळातच आगीचे लोट दिसू लागले यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. लगतच्या व्यापारी व अन्य व्यवसायिकानी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. घटना समजताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बांबच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
आगीत इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कसलही दुर्घटना घडली नाही. आठवडा बाजार खरेदीसाठी मंडईत गर्दी होती. याघटनेंने घबराट पसरली आहे.