भोरः पुणे जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकी मध्ये भोर तालुक्यातील साळव ग्रामपंचायती मध्ये रेखा सागर साळेकर व उपसरपंच पदी रामचंद्र प्रभती साळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.साळव ग्रामपंचायती मध्ये एकुण ७ सदस्य असुन ५ सदस्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली असून २ जागा रिक्त राहील्या आहेत.
उपसरपंच निवडणूकीसाठी शेख यांनी कामकाज पाहिले उपसरपंचकीला एकच अर्ज आल्याने रामचंद्र साळेकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सदस्य पदी रेखा योगेश साळेकर, वंदना पंडित पारठे , विठ्ठल भागुजी साळेकर, बबन कोंडिबा गाडे यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली आहे,उपसरपंच निवडणूकीसाठी प्रशासकीय आधिकारी आय. एल. शेख( शाखा अभियंता पं.स.भोर यांनी कामकाज पाहिले
या वेळी ग्रामसेवक योगेश चव्हाण , माजी उपसरपंच शंकर साळेकर, सागर साळेकर , अंकुश साळेकर ,कृष्णाई जनसेवा संस्थेचे अध्यक्ष बाबाजी साळेकर,शाळा समिती अध्यक्ष दत्ताञय साळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संपत साळेकर, पोलीस पाटील प्रतिक्षा मारूती साळुंखे, राहुल साळेकर,गणेश साळुंखे, नथु साळेकर , योगेश साळेकर, संतोष साळेकर, जगन्नाथ साळेकर,संतोष सणस, वंसत डेरे, सुनिल मोरे,दिलीप कुंभार, इ. महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.