राजगड न्युज नेटवर्क
भोर – रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या रायरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय गेनबा किंद्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे.बिनविरोध निवडणुकीची ४० वर्षाची परंपरा आजही कायम आहे. रायरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुनिता शंकर किंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक झाली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शाखा अभियंता इक्बाल शेख व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुहास गायकवाड यांनी काम पहिले.यावेळी उपसरपंचपदासाठी संजय गेनबा किंद्रे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय नथु रेणुसे कोमल विजय किंद्रे पार्वती कृष्णा जंगम,सुमन अशोक साळुंके,अलका राजेंद्र किंद्रे,तेजश्री देवलिंग जंगम,शंकर किंद्रे सखाराम किंद्रे,नारायण किंद्रे,नितिन किंद्रे मंगेश किंद्रे,बबन किंद्रे,राजेंद्र किंद्रे,सचिन किंद्रे,विजय किंद्रे,सिताराम किंद्रे,सतिष रेणुसे,अशोक साळुंके व ग्रामस्त उपस्थित होते.
रायरी ग्रामपंचायतीची मगिल ४० वर्षापासुन बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राखत यावेळी ग्रामस्थांनी एकञ बैठक घेऊन निवडणूक बिनविरोध करुन सरपंचपदी सुनिता शंकर किंद्रे तर उपसरपंचपदी संजय गेनबा किंद्रे यांची बिनविरोध निवड केली आहे ग्रामस्थांना बरोबर घेऊन रायरी गावाच्या सर्वागिन विकासासाठी विशेष प्रयत्न करणार आसल्याचे सरपंच सुनिता किंद्रे व उपसरपंच संजय किंद्रे यांनी सांगितले फोटो – रायरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय गेनबा किंद्रे यांची बिनविरोध निवड झाली यावेळी सदस्य व ग्रामस्त