भोर: तालुक्यातील धांगवडी येथे एका औद्योगिक शेडच्या बांधकामासाठी अनाधिकृतपणे मुरमाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतरही महसूल विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असा आरोप नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धांगवडी ता.भोर येथील एका खाजगी व्यक्तीने मागील सहा महिन्यापासून औद्योगिक शेड उभारणी काम सुरू केले आहे. या शेडच्या भराव्या साठी बेकायदेशीरपणे लाखो रुपयांच्या मुरमाची वाहतूक करून त्याचा वापर केला आहे. महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता हे उत्खनन केले यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महसूल विभागाकडे तोंडी तक्रार केली असताही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याचा वरदहस्तक कोण हे शोधणे गरजेचे आहे.परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणात महसूल विभागाकडून दाखवण्यात आलेल्या ढिसाळपणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बेकायदेशीर मुरमाचा वापर रोखण्यासाठी विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत का? तक्रार दाखल झाल्यानंतरही कारवाई का करण्यात आली नाही? या प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांचा हात आहे?
असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत. नागरिकांनी या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
या विषयावर स्थानिक तलाठी परमेश्वर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता यावर आम्ही योग्यती कारवाई करणार असून सोमवार पर्यंत पांचामाना वरिष्ठ कार्यालयात पाठवला जाईल.