पुरंदर: तालुक्यातील चिव्हेवाडी घाटातील देवडी गावच्या पिहिल्या वळवणावर सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये कारमध्ये असणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २ वर्षाचे बाळ आणि एक व्यक्ती या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ट्रक चालक याने जागेवरून पळ काढला. यामुळे ट्रक चालकाविरोधात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवडी गावाच्या हद्दीमध्ये चिव्हेघाट सुरू होतो. या ठिकाणच्या पहिल्या वळणावरती अशोक लेलॅंण्ड कंपनीचा ३११६ माँडेलचा १२ टायर ट्रक MH-15-DK-4247 नंबरचा ट्रक भरधाव वेगाने रस्त्याच्या परस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या कार नं-MH-14-DT-9587 गाडीला समोरुन ठोस मारल्याने अपघात घडला. या अपघातामध्ये गणेश उर्फ बाळा शिवाजी लेकावळे, वय 28वर्षे, रा.किकवी, ता.भोर,जि.पुणे व तृप्ती अक्षय जगताप, वय 26वर्षे रा. सुपे खुर्द ता.पुरंदर जि.पुणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश बाबुराव दरेकर रा. धावडी, ता.भोर, जि.पुणे आणि कृष्णा अक्षय जगताप वय 2वर्षे रा. सुपे खुर्द ता.पुरंदर जि.पुणे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची खबर न देता ट्रक चालक निघुन गेला आहे. या अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी माहिती पोलीसांनी दिली. याची फिर्याद रोहीदास पांडुरंग लेकावळे, वय 44 वर्षे, रा. किकवी, ता. भोर, जि.पुणे यांनी सासवड पोलीस स्टेशमध्ये दिली आहे. पुढील तपास सहा.पोलीस उपनिरीक्षक डी.एल.माने हे करीत आहेत.