शिरवळ – पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना व्यक्तीच्या हालचालीवरून त्याच्यावर संशय आला आणि त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व सात जीवंत काडतुसे मिळून आली असून समीर मोहम्मद इसाक खान वय-३२ याला अटक करण्यात आली असून याच्यावर बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडणेने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार ,शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत दि १९ रोजी मॉर्निंग स्कॉड पेट्रोलीग दरम्यान व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद जाणवल्याने ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल व एकुण सात जिवंत काडतुसे मिळून आलो आहेत. शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत मॉर्निंग स्कॉड करीता शिरवळ पोलीस ठाणेचे पोहवा. अंकुश गाडर्डी यांना नेमणेत आलेले होते. मॉर्निंग स्कॉड दरम्यान त्यांना पुणे ते सातारा जाणारे हायवे रोडलगत असले महापारेषण कंपनी समोर सर्व्हिस रोडलगत एक व्यक्ती त्याचे कडील मोटार सायकलसह मिळून आला होता. त्याचेकडे प्रथमदर्शनी विचारपुस केली असता त्याच्या हालचाली व हावभाव संशयीत जाणवल्याने पोहवा गार्डी यांनी याबाबत पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांना कल्पना दिली. शिरवळ पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार जितेंद्र शिदे, पोलीस हवालदार सचिन वीर, पोकों मोझर यांनी सदर व्यक्तीकडे अधिक विचारपुस करुन अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एकूण सात जिवंत काडतुसे मिळुन आली. समीर मोहम्मद इसाक खान वय-३२ वर्ष याने पिस्टल व जीवंत काडतुसे हि बेकायदा बाळगल्याचे निष्पन्न झालेने त्यानुसार त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. याबाबतचा पुढील तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.
सदर कारवाईत पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शन सुचना प्रमाणे सदर कारवाई शिरवळ पोलीस ठाणे कडील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहा. पोलीस निरीक्षक सी.व्ही.केंद्रे,पोलीस अंमलदार अंकुश गार्डी, जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुनिल मोहरे, प्रशांत धुमाळ, अरविंद बाऱ्हाळे, भाऊसाहेब दिघे यांनी सहभाग घेऊन केली आहे.