भोर :
शिवसैनिकांची मनधरणी करण्यासाठी चक्क सुप्रिया सुळे दौरा अर्धवट सोडून मेळाव्याला?
भोर : बारामती लोकसभा मतदार संघावर सर्वांचेच लक्ष लागून आहे . याचे कारणही तसेच आहे ते म्हणजे नणंद भावजया यांच्यातील लढत आणि हे होत असताना भोर तालुक्यातील कापूरहोळ येथील प्रचार दौऱ्यात सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीचा विधानसभा उमेदवाराची घोषणा केली यामुळे भोर तालुक्यातील महाविकास आघाडीत ठिणगी पडली.
एका वक्त्यव्या मुळे भोरमधील ठाकरे गटातील शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी चक्क सुप्रिया सुळे यांनी दौरा अर्धवट सोडून नसरापूरमध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्याला उपस्थिती लावावी लागली. परंतु ताई आल्या पण त्यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना शिवसैनिकांनी पाढाच वाचून दाखवला. ताईंनी प्रयत्न केला परंतु शिवसैनिक नेते आघाडीत पाळत असले तरी शिवसैनिकांत नाराजी मात्र तशीच असल्याची चर्चा मात्र सर्वत्र आहे.
काय विधान होत सुप्रिया सुळेंचे..
सुप्रिया सुळे यांचा शुक्रवारी ( 12 एप्रिल ) भोर तालुक्यात गावभेट दौरा झाला. या दौऱ्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी भोर आजपर्यंत मला तीन वेळा भरगोस मतदान केले आहे. त्यांचं वार असताना देखील आपण काँग्रेसचा विचार सोडला नाही कारण तुम्हाला आधीच कळले होते की मोदी सरकार झोलेबाज आहेत. सातत्याने काँग्रेसचे विचारांनीच हा तालुका काम करत आहे. थोपटे साहेब आणि कैलासवासी चव्हाण साहेब या सगळ्यांचा मानसन्मान ठेवून आपण सर्वजण काम करत आहे. आपण सर्वांनी विधानसभेपर्यंत या स्थापने काम करायचे आहे शब्द देते आपल्याला की पुढील विधानसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार ही संग्राम थोपटेच असतील आणि ते काय आज सहकार्य करतायेत त्यांचे पदाधिकारी सहकार्य करतात त्यांच्यापेक्षा पुन्हा कोणाची पाकळी दहा टक्के मेहनत विधानसभेला आम्ही करू महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय आम्ही स्तब्ध बसणार नाही. या विधानामुळे भोर विधानसभेत महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.