शिरवळ : शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील मटका व्यवसायावर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या पथकाने कारवाई करत सुमारे १४१५१ रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला असून व्यवसाय चालक संतोष जगन्नाथ आवटे वय ४२ वर्षे, (रा. न्यु कॉलनी शिरवळ ता. खंडाळा) यांच्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांनी अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करणे बाबत दिले आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी विशेष पथक तयार करुन फलटण उपविभागातील अवैध धंदयांची माहिती घेवुन प्रभावीपणे कारवाई करणे बाबत. सुचना दिल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल रा. धस यांना गोपणीय बातमीदारा मार्फत शिरवळ गावात अवैध मटका जुगार चालु असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी सदर पथकास शिरवळ गावचे हद्दित अवैध मटका व्यवसायावर छापा टाकणे बाबत सुचना दिल्याने त्यांनी दि १६ रोजी शिरवळ गावचे हद्दित जुना लोणंद रोड लगत शोकत बागवान याचे फ्रुट स्टॉलचे पाठीमागे मोकळया जागेत अचानकपणे छापा टाकला असता सदर ठिकाणी संतोष जगन्नाथ आवटे वय ४२ वर्षे, (रा. न्यु कॉलनी शिरवळ ता. खंडाळा) हा स्वतःच्या आर्थिक फायदया करीता मालक बबलु खान (रा. शिरवळ) याचे सांगणे वरुन अवैध मटका व्यवसाय करीता असताना मिळुन आला असुन सदरवेळी मटका या जुगारावर पैसे लावणारा शंकर हरिबा जाधव (रा. कवठे ता. खंडाळा) हा मिळुन आल्याने दोघांना ताब्यात घेणे आले आहे. या वेळी त्यांच्याकडून एकुण १४१५१/- रुपयाचे जुगाराचे साहित्य मिळुन आले आहे.
सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल रा. धस यांचे मार्गदर्शना खाली पो. हवा.अहिवळे , पो.हवा. भोसले , व निर्भया पथकातील महिला पो.हवा. भोसले , पो.कॉ. कोळेकर, महिला पो.कॉ. कुदळे , पो.कॉ. भिसे यांनी केली आहे.