शिरवळ : अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरना नंतर शिरवळ पोलीस ‘ॲक्शन मोडवर ‘ आले आहेत शिरवळ परिसरात घडणाऱ्या प्रत्येक घटनाकडे पोलिसांचा करडी नजर असल्याचे प्रत्यक्षात निर्दशनात आले . शिरवळ पोलिसांनी परिसरात कारवाई चा मोठा धडाका लावला असुन आपला खाक्या दाखवत एका दिवसात १४ गुन्हे शिरवळ पोलिसात दाखल झाले आहे . याचप्रमाणे फलटण विभागातील निर्भया पथकाने शिरवळ मध्ये येऊन आपल्या कारवाईचा बडगा उघडला आहे .
निर्भया पथकाने एकुण २४ जणांवर गुन्हे दाखल केले . तर १६ मुलामुलींना पोलीसी भाषेत समज दिली . अशाप्रकारे शिरवळ व परिसरात पोलीस कारवाईचा दिवसच साजरा झाला .
यामध्ये एका दिवसात ३८ जणांवर कार्यवाही करण्यात आली . यामुळे पोलीस स्टेशनने आज बेकायदेशीर वागणाऱ्या लोकांना ताब्यात घेतल्याने पोलीस स्टेशनला गर्दीचे स्वरूप आले होते .तर कर्मचारी यांची धावपळ पाहयला मिळाली.
शिरवळ पोलिसांनी शिरवळ ( येथील महामार्ग, शिवाजीचौक, विश्रामगृह चौक, रामेश्वर मंदीर ) सह केसुर्डी, पळशी, हरतळी, गुठाळे, शिंदेवाडी, शेखमिरेवाडी, नायगाव, वडगाव पोतनीस, धनगरवाडी, भोळी, भादे व वीर धरण परिसर, कारवाई करत आपला खाक्या दाखविलेला पाहायला मिळाला. यावेळी अवैध दारू विक्री करणारे शिरवळ ( दोन ठिकाणी मिळून ९००रुपये मुद्देमाल ), केसुर्डी ( ७०० रुपये मुद्देमाल), नायगाव ( ९०० रुपये मुद्देमाल ), वडगाव – पोतनीस ( ९१० रुपये मुद्देमाल ), धनगरवाडी – (४०० रुपये मुद्देमाल ), भोळी -( २८०० रुपये मुद्देमाल ), भादे – ( ९१० रुपये मुद्देमाल ), हरतळी -(९८० रुपये मुद्देमाल ), गुठाळे – ( ७५० रुपये मुद्देमाल), शिंदेवाडी – (८००रुपये मुद्देमाल ) व शेखमिरेवाडी – (९८० रुपये मुद्देमाल ) असे दोन दिवसात १२ ठिकाणी बेकायदा देशी दारु विक्री वर छापे टाकुन १० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . तर जुगार अड्डा वर दोन ठिकाणी छापा मारण्यात आला त्यामध्ये पळशी -येथे तीनपानी पत्याचा डावावर छापा . १४ जणांवर कारवाई, ९०० रुपये रोख व एक लाख पाच हजार रुपयांच्या मुद्देमाल तीन वाहने ) तर शिरवळ येथे मटका अड्यावर छापा, एक हजार १२५ रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हापोलीस प्रमुख व सहाय्यक जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी यांच्या सल्लानुसार, शिरवळ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला .
शिरवळ पोलिसांनी केलेली कार्यवाही : कंसात आकडेवारी :
जुगार अड्यावर छापा ( 2 ), बेकायदा वाहने उभे करणे ( ५ ) , बेकायदा देशी दारू विक्री ( ८ ) – बेकायदा देशी दारु विक्री ( ४ ) असे एकुण १९ गुन्हे दोन दिवसात दाखल .
वाहतूक पोलिसांची धडक कारवाही
महामार्गावर बेकायदा रस्त्यांवर वाहने थांबणे यामध्ये पाच जणावर कारवाई :
यामध्ये ओमिनी कार (रहिमतपुर ), चारचाकी कार ( इस्लामपुर सांगली ), टँकर ( करवीर -कोल्हापूर ), इर्टिगा कार ( भोळी.ता .खंडाळा ), टँकर – (राजेबागेश्रर – इस्लामपुर (सांगली ) )
पोलीस निर्भया पथकाची ही धडक कारवाई :
यामध्ये दुचाकीवर तीन प्रवासी वाहतूक, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे व रोडरोमिओ अशा २४ जणांवर कारवाई, तर महाविद्यालयाच्या १६ जणांना दिली समज, या कारवाईतून एका दिवसात ४१ हजार ५०० रुपयांची दंडात्मक रक्कम जमा होणार असून शिरवळ येथील शिवाजीचौक, विश्रामगृह चौक व रामेश्वर मंदीर येथे केली पुढील दिवसातही अशीच कारवाई होणार आहेत तसेच निर्भया पथकाने टायको कंपनीमधील महिलांना निर्भया उपक्रमाबाबत माहिती दिली . यानतंर येथील शाळा -महाविदयालयात मुलीसाठी मार्गदर्शन शिबीर घेणार असल्याचे सांगितले या कारवाई मध्ये निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस वैभवी भोसले, राणी कुदळे, दत्तात्रय भिसे, फैय्याज शेख, भाऊसाहेब दिघे व अरविंद बाराळे यांनी सहभाग घेत दिवसभर शिरवळ शहर पिंजुन काढले