खेड शिवापुर: खेड शिवापुर परिसरात गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजारपेठेला ऊत आला आहे. गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण केली जात असून याच टंचाईचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय उभारण्यात आले आहेत यासाठीच गॅस सिलेंडर विक्रेत्यांकडून गॅस सिलेंडर टंचाई निर्माण करून काही दुकानदार या परिस्थितीचा फायदा घेत गॅस सिलिंडर जास्त दरात विकत आहेत तर मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरपेक्षा घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त असल्याने हॉटेलचालक यांचा वापर करत आहेत. सिलेंडर विक्रेत्यांकडून नवशे दहा रुपयाच्या गॅस सिलेंडरचे नवशे पन्नास ते एक हजार रुपये तर काही अकराशे ते बाराशे रुपये घेतायेत यामुळे नागरिकांना गॅस सिलिंडर मिळणे कठीण होत आहे. या प्रकरणी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काळ्या बाजारपेठेवर कारवाई करण्याची आणि हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर रोखण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या गॅस सिलेंडर टंचाईमुळे नागरिकांकडून गॅस सिलिंडरची टंचाई का निर्माण झाली आहे?काळ्या बाजारपेठेवर कारवाई का होत नाही?हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.या प्रकरणी कायद्याची अंमलबजावणी करणारे काय कारवाई करतात हे पाहणे बाकी आहे.