भोर प्रतिनिधी
भोर तालुक्यातील भाटघर धरण परिसराच्या भुतोंडे खो-यातील कांबरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेश्मा गणेश खुळे यांची निवड शुक्रवार (दि२४) विद्यमान सरपंच मनिषा सुदाम ओंबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. उपसरपंच पदासाठी रेश्मा खुळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना उपसरपंच म्हणून बिनविरोध घोषित करण्यात आले अशी माहिती सरपंच मनिषा ओंबळे यांनी दिली. या निवड प्रक्रियेचे कामकाज निरीक्षक म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मेहबूब शेख यांनी पाहिले तर सहाय्यक निरीक्षक म्हणून ग्रामसेवक सचिन काटे यांनी काम पाहिले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य मोहीनी शिळीमकर,आरती चौधरी,किरण चिकणे, दत्तात्रय सुकाळे उपस्थित होते.उर्वरित दोन सदस्य गैरहजर होते. सरपंच मनीषा ओंबळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच रेश्मा खुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लालासो शिळीमकर, हनुमंत खुळे, नथुराम सुकाळे, दशरथ शिळीमकर , विठ्ठल चिकणे, जगन्नाथ जंगम, विजया चिकणे, अलका ओंबळे,अरूणा जंगम, मनीषा खुळे, सुरेखा खुळे,सारीका खुळे ,सुदाम ओंबळे आदि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.