फलटण: फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाचा निर्दय खून झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सीकाबाई तुकाराम शिंदें,सुमित तुकाराम शिंदे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. ते दोघेही पारधी समाजाचे होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी लवकरच काही नागरिकांना रस्त्यावर दोघांचेही मृतदेह पडलेले दिसले. मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत होते. घटनास्थळी तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या निर्दय खून कोणत्याने आणि का केला याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत. घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्यात आले आहेत आणि त्यांच्यावर तपास केला जात आहे. पोलिसांनी लवकरच आरोपींना ताब्यात घेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे फलटण तालुक्यातील निंभोरे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.