नसरापूर : शिवरे गावातील बागायती क्षेत्रातून जाणाऱ्या व शेतकऱ्यांवर लादलेल्या प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता गुरुवारी (दि. १३) जमिनींची मोजणी होणार आहे. परंतु ही मोजणी न होऊ देण्याचा निर्णय शिवरे ग्रामस्थांनी घेतला आहे.
पुणे सातारा महामार्गावर असलेल्या शिवरे गावातील बागायती क्षेत्रातून जाणाऱ्या व शेतकऱ्यांवर लादलेल्या प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता गुरुवारी (दि. १३) जमिनींची मोजणी होणार आहे. या मोजनिला ग्रामस्थांचा विरोध असून शिवरे येथील ग्रामस्थांची मंगळवारी (दि. ११) बैठक पार पडली. ग्रीनफिल्ड महामार्गाची चुकीची अधिसूचना रद्द करून नियोजित आराखड्याप्रमाणे रिंगरोड पूर्वीप्रमाणेच करावा. शेतकऱ्यांनी व कृती समितीने रिंगरोडच्या भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवला असून, जमिनींची मोजणी साठी नोटिसा न स्वीकारण्याचा निर्णय घेत कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
नोटिसा कोणीही स्वीकारू नये..(No one should accept notices..)
जमीन मोजणीच्या नोटिसा महसूल विभाकडे आल्या असून या नोटिसा कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन बैठकीत ग्रामस्थ व रिंगरोड कृती समितीने केले आले.
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट (Ghat to eliminate farmers in the name of development)
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट घातला असून, शेतकऱ्यांनी रिंगरोडला वेळोवेळी हरकत घेऊन पूर्ण विरोध करूनही शासनाने गुरुवारी पोलिस बंदोबस्तात भूसंपादनाचा निर्णय घेतला आहे. मात्र, या मोजणीला तीव्र विरोध करीत वेळप्रसंगी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अन्याय करण्यासाठी फक्त शिवरे गावच का?
उड्डाणपूल होत नसल्याने निष्पाप नागरिकांना जीवाला मुकावे लागत आहे.यापूर्वी गावातून अनेक बाबीसाठी शासनाने जमिनीचे अधिग्रहण केलेले आहे. रिंगरोडच्या जाण्याने सर्व शेतजमिनी जाणार आहे. यामुळे अनेकांना गाव सोडण्यापलिकडे कोणताच पर्याय राहणार नाही. अन्याय करण्यासाठी फक्त शिवरे गावच का? असा प्रश्न ग्रामस्थ करत आहे.
किती क्षेत्र होणार संपादित
रिंगरोड व पुणे संभाजीनगर हरितक्षेत्र राजपत्र – अधिसूचनेनुसार या भागातील ९९ महसुली गट बाधित होत आहेत. बारमाही बागायती असणारे तब्बल २२३ एकर क्षेत्र संपादित होणार आहे.