पेण प्रतिनिध:किरण बांधणकर
पेण: लोकसभेची उमेदवारी मी जाहीर करत आहे,माझ्या विरोधात कोण लढेल हे मला माहीत नाही पण मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे असे वक्तव्य माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी करत आमदार रविशेठ पाटील यांच्या उरावर तटकरे बसतील असा इशाराच दिला ते पेण येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आयोजीत केलेल्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी बोलतं होते.
यावेळी त्यांनी भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचे त्यांनी सांगीतले.कार्यक्रमा वेळी अनंत गीते यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी शिंदे गट शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख योगेश पाटील यांनी अंसख्य कार्य कर्त्यांबरोबर ठाकरे गटात प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या समवेत संपर्क प्रमुख विष्णू भाई पाटील,जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, माजी उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख जगदिश ठाकूर,रशाद मुजावर,युवा नेते समीर म्हात्रे,माहीला संघटीका दीपश्री पोटफोडे, श्रीतेज कदम,राकेश मोकल आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकार्त्ये उपस्थीत होते.