कुंदन झांजले: राजगड न्युज
भोर: शहरासह ग्रामीण भागात पाचव्या दिवशीची गणेश विसर्जन मिरवणूक भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि.२३) शांततेत पार पडली.त्यांनी योग्य नियोजन व चोख बंदोबस्त ठेवला होता.भोरमधील नावाजलेले नवयुग मित्र मंडळानी दरवर्षी प्रमाणे यंदाही लाईनच्या गणपतीत सहभागी न होता दुपारी मिरवणूक काढून शांततेत पार पाडली.
यावेळी त्यांनी श्रीरामाचे परमभक्त बजरंग बली हनुमान व वानर सेनेचा जिवंत देखावा सादर केला होता. बजरंग बली हनुमंताचे हे प्रचंड भव्य दिव्य अवतारुप पाहण्यासाठी भोर शहरासह आजुबाजुच्या परिसरातून प्रचंड गर्दी जमली होती.
ढोल लेझीम पथक व श्रीरामांच्या भावभक्ती गीतांवर बजरंगबलींनी व वानरसेनेंनी नृत्य करत गणेशाच्या मिरवणूकीत भाव भक्तीने रंगत आणली. नवयुग मित्र मंडळानी केलेल्या या जीवंत देखाव्याचे व ढोल लेझीम ताशा पथकाचे शहरात प्रचंड कौतुक होत आहे.