सालभर करत असलेल्या कष्टाच झाले चीज
भोर तालुक्यात सध्या पावसाची रिमझिम सुरू असुन पावसाचे पाण्याने ओढे ,नाले,नदीचे पाणी गढुळ झाले आहे . त्यामुळे मच्छिमारांना सुगीचे दिवस आले असल्याचे चित्र आहे.सर्वत्र मच्छिमारांना मुबलक प्रमाणात मासे मिळत आहेत.अशाच मच्छिमारांपैकी वडगाव डाळ(ता.भोर) येथील प्रकाश जाधव व अतुल परखांदे या मच्छिमारांना विंग गावच्या हद्दीत नदीच्या पाण्यात तब्बल १८ व २० किलोचे कटला जातीचे मासे जाळ्यात सापडले. हे मासे ४००रू किलो भावाने या माशांची विक्री केली जात आहे.मागे दोन दिवसापूर्वीही असेच १६ ,१७ किलो मासे भेटले होते असे या मच्छिमारांनी सांगितले.
वर्षभर उन्ह ,वारा ,पाऊस यांची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची उपजीविका चालविण्यासाठी हे मच्छीमार मासेमारीचि व्यवसाय करत आहेत.सध्या या मिळालेल्या मोठ्या माशांमुळे त्यांच्या विक्रीतून चांगली समाधानकारक कमाई होत आहे व सालभर करत असलेल्या कष्टाच चीज झाल्याचे या मच्छिमारांकडून सांगण्यात आले.