राजगड न्युज: कुंदन झांजले
वरंधा घाट परिसरात वाहने कोसळण्याचे सत्र सुरूच
भोर – महाड मार्गावरील वरंधा घाटातील वारवंड- शिरगाव हद्दीतील वळणावर चारचाकी वाहन निरा- देवघर धरणाच्या दरीत कोसळून चारचाकी वाहनाचा अपघात शनिवार दि.२३ झाला. नशीब बलवत्तर म्हणून धरणाच्या पाण्यात गाडी पडली नसल्याने वाहनातील दोन्ही व्यक्ती बचावले असून जखमी अवस्थेत आहेत.
दरम्यान दोन्ही जखमींना वरंधा घाट मार्गावरील प्रवाशांनी अपघात ग्रस्त गाडीतून बाहेर काढून भोरकडे उपचारासाठी आणण्यात आले.
निरा- देवघर धरणाच्या पाण्यात तसेच दरीत वाहने कोसळण्याचे मागील चार महिन्यांपासून ही तिसरी घटना असल्याने वाहने कोसळण्याचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे.अपघातातील चार चाकी वाहन खोल दरीत झाडाझुडपात तसेच धरणाच्या पाण्याच्या बाजूलाच कोसळल्याने गाडीचा नंबर समजू शकला नाही.