भोर – कापुरव्होळ रस्त्यावरील कापुरव्होळ (ता.भोर)गावच्या हद्दीतील शेतात असणाऱ्या खांबावरील विद्युत वाहिनीतार तुटून खाली पडल्याने या विद्युत वाहिनी तारेचा शेतात गेलेल्या येथील गावच्या एका तरुणाला जोरदार धक्का बसल्याने या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार( दि.१८) सकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार कापूरव्होळ येथे शेतात कामानिमित्त गेलेला तरुण मच्छिंद्र बबन अहिरे वय- ४२वर्ष यास महावितरणच्या वीज खांबावरील विज वाहक तार खाली पडल्याने या तरुणास या विद्युत वाहक तारेचा करंट पास होऊन जबरदस्त शॉक लागला. यामुळे तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. याबतची खबर शेजारील शेतकरी गोरक्षनाथ अहिरे यांनी राजगड पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळवताच क्षणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य ती कार्यवाही करत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय भोर येथे पाठविला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या भोर तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे तसेच जोरदार वारे वाहत आहे.पाऊस व वाऱ्यामुळे महावितरणच्या वीज वाहक तारा तुटण्याचे प्रकार वारंवार घडत असतात.त्याप्रमाणेच कापूरहोळ येथे महावितरणच्या खांबावरील वीज वाहक तार शेतातील पाण्यात तुटून पडली व ही घटना घडली आहे. मृतदेह ताब्यात घेण्यावरून या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता परंतु महावितरणच्या अधिका-यांनी अहिरे कुटुंबीयांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नूकसान भरपाई देण्याचेही आश्वासन दिले.याबाबत राजगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.