अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय,शैतक-याचे मोठे नुकसान
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील खानापूरच्या नांगरेवाडी येथील शेतकरी सुनील दिनकर बांदल यांनी जनावरांच्या चाऱ्याचा(भात भेळा) साठा करून ठेवला होता. सुनील यांच्या चाऱ्याच्या गंजीला कोणीतरी अज्ञाताने आग लावून दिल्याची घटना सोमवार दिं.२९ घडली. यात तीनशे भात भेळा जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे हजारों रुपयांचे नुकसान झाले.
सध्या भोर तालुक्यातील शेतकरी लगबगीने गवत कापणी करून ,भात पेंढा जमा करून भविष्यात जनावरांचा जमा करून सदरील गवताची तसेच भात भेळ्यांची साठवणूक घराशेजारील मोकळ्या जागेत करून एका जागेवर ठेवत आहेत. या चाऱ्याचा शेतकरी उन्हाळ्यात जनावरांसाठी उपयोग करीत असत. सुनील बांदल या शेतकऱ्यानेही असाच जनावरांसाठी चारा साठवणूक करून ठेवला होता. त्यांच्या अशाच साठवून करून ठेवलेल्या पाचशे चाऱ्याच्या ढीगाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्याची घटना घडली. गावातील प्रवीण नांगरे ,अजय धोत्रे, मनोज वाडकर ,राजू धोत्रे ,किरण नांगरे ,सुनील बांदल, अविनाश बांदल या तरुणांनी तात्काळ याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून आगीतून दोनशे चाऱ्याच्या पेंढ्या विझवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला व आग विझविली. या शेतक-याचे मोठे नुकसान झाल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.