भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
मराठा आरक्षण लढ्याला जाहीर पाठिंबा
भोर तालुक्यातील मागील पंचवार्षिक विधानसभेची निवडणूक लढलेले व शिवसेना पक्ष ज्यांनी भोर तालुक्यात खेडोपाडी पोहचवला असे केळवडे गावचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य कुलदीप सुदामराव कोंडे यांनी आपल्या पुणे जिल्हा संघटक या पदाचा राजीनामा शिवसेना (उ बा ठा ) पक्षाचे जिल्हाप्रमुख व पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्याकडे पत्राद्वारे सोमवार (दि ३०) पाठवत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.
ज्या समाजाने मानसन्मान देऊन मला मोठे केले त्याच समाजाप्रति आदरपूर्वक जागरूक राहून मी मराठा नागरिक म्हणून सामाजिक भावनेने सर्वसामान्यांचा आदर राखत या आरक्षण लढ्यात सामील होत आहे .मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे याकरीता या आंदोलनाला, लढ्याला जाहीर पाठिंबा देत असुन मी पक्षाच्या पुणे जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला आहे असे त्यांनी सांगितले.