शिरवळ : खंडाळा तालुक्यातील सांगवी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीने दत्तनगर शिरवळ येथे राहणाऱ्या अक्षय लांडगे याचे विरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतु सदर गुन्ह्यातील आरोपी पंधरा दिवसाच्या आत जामिनावर सुटल्याने भीती व नैराश्यपोटी दि.१६ रोजी पहाटे चार वाजता राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेत तिने आपले जीवन यात्रा संपवली व आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहून संबंधित अक्षयला शिक्षा करण्याची मागणी केली आहे .
याच प्रकरणी सांगवी ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत पोलीस स्टेशन समोर ठिया आंदोलन करीत पोलीस प्रशासनाला जाब विचारला तसेच या गुन्ह्यातील तपाशी अधिकारी ऋषाली देसाई अधिकारी यांनी आगोदर इथे यावे व सातारा SP यांनी यावे अशी सांगवी ग्रामस्थांची मागणी तो पर्यंत आम्ही हलणार नाही ग्रामस्थ ठाम असून न्याय न मिळाल्यास ग्रामस्थांच्या वतीने ३ जानेवारी सावित्रीमाई यांचे जयंती दिनी रास्तारोको करणार असल्याचे सांगितले.
महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी ट्विट करून घेतली दखल
तरुणाच्या छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातल्या शिरवळ येथे घडली आहे. मुलीने आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितल्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र जामिनावर सुटलेल्या आरोपीने पुन्हा त्रास दिल्याने या विद्यार्थिनीने आत्महत्येचे पाऊल उचलले. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. पहिल्यांदा तक्रार झालेली असताना देखील कठोर कारवाई का झाली नाही ? पोलिस महासंचालकांनी याचा तपास या प्रकरणात करावा,पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर सुद्धा मुलींना सुरक्षित वाटत नसेल तर नक्कीच हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. या संपूर्ण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून पोलीस अधीक्षक, सातारा यांच्याकडून वस्तूस्थितीदर्शक अहवाल तात्काळ मागवण्यात आला आहे. मी स्वतः तपास अधिकारी व संबंधित पोलिस यंत्रणेच्या संपर्कात राहून पाठपुरावा करीत आहे.