पिंपरी : “रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे या सर्वांचे एकच गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील!” असे गौरवोद्गार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले आहे. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त वाफगाव (ता. खेड) येथील श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता.२३) करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना वरील गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले आहेत. (Pimpri News) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा येथील रयत शिक्षणसंस्थेचे जनरल बॉडी सदस्य उदय शिवाजीराव पाटील होते. यावेळी वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर, माजी विद्यार्थी ॲड. सतिश गोरडे, वाफगावचे सरपंच राजेंद्र टाकळकर, मुख्याध्यापिका जयश्री आसवले, उपायुक्त सुभाष इंगळे, प्रा. दिगंबर ढोकले, राजेंद्र शिंदे, धनंजय भागवत, सुरेश कराळे आदि मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमापूर्वी, वाफगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांची बैलगाडीमधून उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.(Pimpri News) त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना गिरीश प्रभुणे यांनी अनेक दाखले देत भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरांचा उल्लेख केला.