भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर तालुक्यातील महुडे खो-यातील किवत, गवडी, शिंद, नानाची वाडी , सणसवाडी, खालचे नांद , वरचे नांद येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सायबेज आशा या कंपनी मार्फत व एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.यामध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या शाळांमधील एकूण २४० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना डोळ्यांनी दिसण्याबाबत अडचण होती अशांना मोफत चष्मे देण्यात येणार आहे. या नेत्र तपासणी शिबिरासाठी सायबेज आशा कंपनीच्या अधिकारी वर्गातील प्रदीप दळवे ,राकेश कांबळे, सागर सहाने , मंगेश सोनवणे, एच व्ही देसाई डॉक्टर अक्षय व गौरी वेदपाठक उपस्थित होते तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते माऊली दुधाणे योगेश दुधाने ,सागर सणस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रा. अविनाश कुचेकर हे उपस्थित होते. नेत्र तपासणी करताना शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच आनंद निर्माण झाला होता व त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य वेगळाच अनुभव असल्याचे कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले .