पाचगणी : मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आजकाल पालकांनीच मोबाइलमधून बाहेर पडावे. फुटबॉल, कबड्डी सारख्या तांबड्या मातीतील व मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असून पांचगणीतील हनुमान मंडळाने हे वृत्त कायम जोपसावे. असे प्रतिपादन पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी व्यक्त केली.
पांचगणी (ता. महाबळेश्वर) येथील हनुमान मंडळ आणि पी.सी.एल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ११ ए साईड फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. (Pachgani News) या स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्या प्रसंगी जाधव बोलत होते. यावेळी पांचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंश माने, मॅप्रो फूडचे संचालक निकुंज व्होरा, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अजित कासुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेश माने म्हणाले या मैदानी खेळांमधून भावी पिढी सुदृढ होण्यास मदत होणार आहे. हनुमान मंडळाने अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन करावे.दरम्यान, ही तीन दिवसीय स्पर्धा बिल्ली मोरिया हायस्कूल च्या मैदानावर होत असून एक ते तीन क्रमांकांच्या विजेत्या संघांसाठी (Pachgani News) अनुक्रमे प्रथम क्रमांक हनुमान मंडळाकडून ३१ हजार, द्वितीय क्रमांक अजितभाऊ कासुर्डे यांच्याकडून २१ हजार, तृतीय क्रमांक महेश खांडके यांच्याकडून ११ हजारांचे रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.