दत्तात्रय कोंडे: राजगड न्यूज
खेड शिवापूर: पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार खेड शिवापूर (ता. हवेली) येथील शिवभूमी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी भाऊराव नवगिरे यांना देण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी शिक्षक आमदार जयंत तासगावकर, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, दत्तात्रय सावंत, जी के पाटील, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, लेखक व उद्योजक शरद तांदळे व जिल्ह्यातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते नवगिरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवगिरे सर यांनी खेड शिवापूर येथील शिवभूमी विद्यालयात २० जून १९९० मध्ये कार्यरत झाले. आपले शैक्षणिक कौशल्य, तसेच विद्यालयात राबविणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये असणाऱ्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शिक्षक, पर्यवेक्षक व मुख्याध्यापक अशा विविध पदांवर अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केलेले आहे .या प्रामाणिक कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शिवभूमी शिक्षण मंडळाचे सचिव संग्राम कोंडे तसेच सर्व संचालक मंडळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नवगिरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.