शिरवळ: शिरवळ येथे एका 28 वर्षीय तरुणाने MDT डायल 112 वर खोटा कॉल करून पोलिसांना नाहक त्रास दिल्या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.10 रोजी 00.01 वाजता, शिरवळ पोलीस ठाण्यातील सहा फौजदार विलास यादव यांना MDT डायल 112 वरून कॉल आला.कॉलरने त्याने मर्डर केल्याची आणि त्याला अटक करण्याची मागणी केली.कॉलरने फोन बंद केल्याने आणि पुन्हा कॉल केल्यावर योग्य माहिती न दिल्याने, पोलिसांनी वरिष्ठांना कळवून घटनास्थळी पोहोचले.घटनास्थळी फार्महाउस मालकाला विचारले असता त्यांनी मर्डर सारखी घटना घडल्याचे नाकारले.कॉलरला पुन्हा फोन केल्यावर त्याने वेगवेगळी ठिकाणे सांगितली.शेवटी फोन करणाऱ्या तरुण सटवाई कॉलनी, शिरवळ येथून शुभम उर्फ सोन्या रमेश पंडित (वय 28 वर्षे ताब्यात घेण्यात आले.चौकशीत त्याने खोटा कॉल केल्याची कबुली दिली.त्यानुसार शुभम उर्फ सोन्या रमेश पंडित (वय 28 वर्षे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे.तर पुढील तपास शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार केगले करीत आहेत.
- शिरवळ पोलिसांचे आवाहन नागरिकांना आवाहन
नागरिकांनी MDT डायल 112 सारख्या महत्त्वपूर्ण सेवांचा गैरवापर करू नये.
खोटी माहिती देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
या घटनेमुळे पोलिसांवर अनावश्यक दबाव निर्माण होतो आणि खरोखर मदतीची गरज असणाऱ्या लोकांपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो.
नागरिकांनी जबाबदारीने वागून अशा प्रकारचे कृत्य करू नये असे पोलिसांनी आवाहन केले आहे.**