प्रतिनिधी -कुंदन झांजले .
भोर पसुरे मार्गावरील रहदारीच्या असणा-या पृथ्वीराज पेट्रोल पंपाशेजारील रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून तेथील रस्ता उघडला आहे त्यामुळे संबंधित रस्त्यावरून जात असताना वाहनचालकांना मोठी कसरत करून जावे लागत आहे संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी वाहतूकदार व नागरिकांकडून होत आहे.
भोर शहरापासुन पसूरे व महुडे भागात जाण्यासाठी भोलावडे येथील गणेशनगरपर्यंत वाहतूकीसाठी एक मार्ग रस्ता आहे. याच रस्त्यावर वेळवंड पसुरे व महुडे खो-यातुन नागरिकांची मोठी ये जा असते. या भागातील अनेक शाळकरी मुले , तरुण तरुणी शिरवळ, पुणे ,भोर या ठिकाणी कामानिमित्त या रस्त्यावरून ये जा करतात . राजा रघुनाथराव विद्यालय हायस्कूल , पेट्रोल पंप हे या रस्त्यालगत आहे .त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच रहदारी असते . पावसाळ्यात तर या खड्ड्यातुन पाणी साचून पाण्याचे तळे होत आहे.राजतेज पार्क हि मोठी सोसायटी या ठिकाणी आहे .त्यामुळे संबंधित रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली आहे.