राजगड वृत्तसेवा
भोर : कासुर्डी ता भोर गावाच्या हद्दीमध्ये सुविधा वृदांवन गृह निर्माण संस्थे मध्ये सुमारे ३ लाख 90 हजार रुपयांची घरफोडी झाली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. झालेल्या घरफोडी बाबत बाळासाहेब दत्तात्रय सोळाकुरे वय 50 रा. सुविधा वृंदावन गृह निर्माण संस्था दुसरा मजला प्ल/ट नं. ए/ 212 कासुर्डी ता. भोर जि. पुणे यांनी राजगड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,कासुर्डी ता. भोर जिल्हा पुणे येथील सुविधा वृदांवन गृह निर्माण संस्था, दुसरा मजला फ्लॅट क्र. ऐ 212 या फ्लॅटच्या सेप्टीडोअरला लावलेले कुलूप व आतील लाकडी दरवाज्यास लावलेले लॅच कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कश्यानेतरी उचकटुन तोडुन आत प्रवेश करून बेडरूमधील कपाट फोडुन कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण 390275.00 रु चा माल ल घरफोडी चोरी करून चोरून नेलेला आहे. तसेच त्याच सोसायटी मध्ये राहात असलेल्या सुविधा वृदांवन गृह निर्माण संस्था, मधिल चौथ्या मजल्यावर राजेंद्र वसंत वैद्य यांचा फ्लॅट नं. ए/402 व पहिला मजल्यावर रहाणारे सुभाष गायकवाड फ्लॅट नं. ए 102 व पहिल्या मजल्यावर रहाणारे अशुतोष सोस्त्रि यांचा फ्लॅट नं. बी. 101 यांचे रिकामे फ्लॅट फोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला असून याबात बाळासाहेब दत्तात्रय सोळाकुरे वय 50 रा. सुविधा वृंदावन गृह निर्माण संस्था दुसरा मजला प्ल/ट नं. ए/ 212 कासुर्डी ता. भोर जि. पुणे यांनी राजगड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाची पहाणी केली असून पुढील तपास पोसई जोशी करीत आहेत.