वाई प्रतिनिधी : सुशील कांबळे
वाई : महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेण्याच्या नादात एक महिला दरीत कोसळून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मृत महिला पुणे येथील असल्याची माहिती मिळाली असून, अंकिता सुनिल शिरसकर (वय २३) असे तिचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मृत अंकिता तिच्या पतीसोबत पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनाला आली होती. ते दोघे दुचाकीवरुन आले होते. यावेळी केट्स पॉईंट परिसरातील नीडल होल पॉईंट येथे अंकिता सेल्फी घेत होती.
यावेळी तोल जावून ती दरीत कोसळली. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याने तिचा मृत्यू झाला.