सारोळे(ता. २ मार्च): पुणे-सातारा महामार्गावर आज सकाळी सारोळे गावच्या हद्दीत गॅस वाहतूक करणारा एक कंटेनर पलटला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, कंटेनर एम एच ४३वाय ७६९४ पुण्याहून साताऱ्याकडे जात होता. सारोळे गावच्या हद्दीत एका वळणावर टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
मात्र, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक कोंडी सुटण्यासाठी पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. सुमारे एका तासानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
या अपघातामुळे वाहनचालकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली. तसेच, गॅस गळतीची शक्यता असल्यामुळे काही वेळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता. कोणतीही काळजी न घेता व सुरक्षेचा विचार न करता सुमारे ५५० किलो गॅस असलेला कंटेनर क्रेंनच्या साह्याने बाजूला करण्यात आला.
वाहतूक सुरक्षेचे नियम धाब्यावर
गॅसने भरलेला कंटेनर असताना देखील गॅस कंपनीकडून कोणत्या प्रकारचे सुरक्षेची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अधिकारी भेट देण्यासाठी व जागेची पाहणी करण्यासाठी आले देखील आले नाहीत पोलीस प्रशासनाला सांगून कोणतंही पाहणी न करता गॅस कंटेनर उचलण्यात आला. महामार्ग प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची क्रेन देखील व अधिकारदेखील पाठवण्यात आले नाहीत. यामुळे सर्व प्रकारचा ताण हा वाहतूक पोलिसांना सहन करावा लागत आहे नेहमीच वाहने उचलण्यासाठी भाड्याने क्रेन आणावी लागते महामार्ग प्रशासन कोणत्या प्रकारची वाहने देत नसल्याचे देखील एपीआय खतीब यांनी सांगितले
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.