सारोळा – पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक करणाऱ्या ट्रक ने अचानक पेट घेतला या घटनेत ट्रक मधील लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक भंगार ट्रकसहीत जळुन खाक झाले आहे.वाहन चालकाच्या प्रसंग अवधनाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार,पुणे सातारा महामार्गावर जुने लॅपटॉप काॅम्पुटर इलेक्ट्रॉनिक पार्ट घेऊन निघालेला ट्रक भोर तालुक्यातील निगडे गावच्या हद्दीतुन जात असताना मागील बाजूने अचानक पेट घेतला ट्रक मागुन पेटल्याची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी ट्रक चालकाला दिल्यावर चालकाने ट्रक एकाबाजूला घेतला तो पर्यंत ट्रक ने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. चालक व क्लिनरने प्रसंगावधान राखून ट्रक बाजूला घेऊन ट्रक मधुन त्वरित बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही.
यावेळी घटनेची माहिती मिळताच किकवी पोलीस व महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत भोर अग्निशमन केंद्राचा बंब मागवला परंतु बंब येई पर्यंत ट्रक साहित्यासह पुर्ण जळुन खाक झाले होते या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले