खंडाळा : शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी वाढदिवस साजरा न करता त्याऐवजी सातारा शिवसेनेतर्फे यशोधन अनाथालय वेळे या ठिकाणी असलेल्या मनोरुग्ण, दिव्यांगांसोबत संपूर्ण दिवस व्यतीत करत आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या शिवसैनिकांना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी कोणत्याही भेटवस्तू न आणता त्याऐवजी यशोधन अनाथालयात भेट स्वरूपात मदत द्यावी असे आवाहन केले होते यावर शिवसैनिकांनी दाद देत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथालयात विविध प्रकारच्या भेटवस्तू दिल्या तसेच पुरुषोत्तम जाधव यांनीही अनाथालयास पन्नास हजार रुपयांची मदत केली.
यावेळी यशोधन अनाथालयाचे संस्थापक रवी बोडके यांच्या अतुलनीय समाजकार्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्याद्वारे करण्यात आला.