कापूरहोळ : भोर तालुक्यातील कापूरहोळ-भोर रस्त्यावर भरधाव डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने लताबाई गोपाळ येलमकर (वय ६५ वर्षे, सध्या रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कापूरहोळ भोर रस्त्याचे गेली अनेक दिवसापासून काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणत रस्त्याची दुरवस्था झाली असून खडी देखील अस्ताव्यस्त पडलेले आहे.इंगवली गावाच्या हद्दीत हॉटेल जय मल्हार समोर देखील अशीच अवस्था आहे त्यातूनच मयत महिला व तिचा मुलगा महाड या ठिकाणी निघाले असता खडी वरून दुचाकी ( एम.एच.१२ पी.यु. ३०९३) घसरली असता लताबाई गोपाळ येलमकर (वय ६५ वर्षे, सध्या रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे) या खाली पडल्या. पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपर (एम.एच.१३ डी.क्यू.००९२) लताबाई यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर अपघात होताच वाहन चालकाने वाहन सोडून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनाम्याचे काम सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.
माणुसकी उरली नाही
घटना घडल्या नंतर सुमारे एक तास मृतदेह जागेवरच आहे त्या अवस्थेतच पडली होती. तर मृतदेहाच्या जवळ जाण्याची कोणी धाजवत नव्हते तर रस्त्यावरील वाहनधारक कोणीही थांबण्यास तयार नव्हते.