भोर शहराच्या नजीक असणाऱ्या भोलावडे गावात रोटरी क्लब ऑफ कात्रज पुणे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस विविध शालेय उपयोगी विकास कामे करण्यात आली. त्यासाठी राकेश सणस यांनी मोलाचे सहकार्य केले. त्या केलेल्या कामांचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सचिव अस्मिता पाटील,नितीन नाईक, नमिता नाईक ,मुग्धा कुलकर्णी, चित्रा कुलकर्णी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठल आवाळे, विद्यमान सरपंच प्रविण जगदाळे , तंटामुक्ती अध्यक्ष गजानन आवाळे ,मनोज आवाळे आदिसह ग्रामस्थ महिला विद्यार्थी उपस्थित होते
या कामांमध्ये शाळेचे बाह्य रंग रंगोटी, चित्रकाम, नाम फलक लेखन, मुख्य इमारतीचे तीन नवीन दरवाजे , शौचालयाचे तीन नवीन दरवाजे बसवण्यात आले. हॉलमधील रंगकाम, चित्रकाम, स्टेज, फरशीकाम म्युझिक सिस्टीम, फॅन, ट्यूबलाईट, सुसज्ज हॉलची दुरुस्ती करण्यात आली. तसेच मुख्य इमारतीतील सर्व वर्गांचे लाईट फिटिंग, ट्यूबलाइट फॅन फिटिंग पूर्णपणे करण्यात आली .याप्रसंगी कार्मुयक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोज जगताप यांनी केले व सहशिक्षक लोहोकरे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार शिक्षण समिती अध्यक्ष दत्तात्रय अब्दागिरे यांनी मानले.