भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोर: शहरातील रामबाग रोडवरील पाच हार्डवेअरची दुकाने भुरट्या चोरांनी मंगळवार दिं.२६ पहाटेच्या दरम्यान फोडल्याची घटना घडली असून दुचाकी वरून आलेल्या चोरट्यांनी दुकानांमधील कागदपत्रे तसेच २० ते २२ हजारांची रोख रक्कम पळवली.
मिळालेल्या माहितीनुसार रामबाग रोडवरील गायत्री ट्रेडर्स,अंबिका हार्डवेअर, शेतकरी कृषी सेवा स्टोअर्स,परदेसी इंटरप्राईजेस,सुयोग ट्रेडर्स अशा पाच दुकानांची कुलूपे कापून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश करीत मुद्देमाल लंपास केला.
घटनास्थळी भोर पोलीस पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.