लोकनियुक्त सरपंचांकडुन गावात विविध उपक्रम
भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पसुरे या ठिकाणी गावच्या विद्यमान सरपंच प्रविण ऊर्फ पंकज धुमाळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून गावातील लोकांना एक हात मदतीचा पुढे करत विविध साहित्य वाटप शनिवार (दि.२९)केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना स्कूल बॅगक्ष व साहित्य वाटप ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी सेवा भारती ट्रस्टचे प्रवीण देशपांडे , विठ्ठल तनपुरे , विराज सस्ते, बारे खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली बदक, उपसरपंच अनंत सणस, विकास सोसायटी चेअरमन रामचंद्र देशमुख, माजी उपसरपंच बाजीराव सणस, डॉ. हनुमंत खामकर, सुरेश धुमाळ, सुरज जगताप, सोमनाथ धुमाळ, कुणाल धुमाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, विशाल धुमाळ आदींसह गावातील ग्रामस्थ महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच गावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेत मोफत गोळ्या औषधे ,वाटप करण्यात आले. शाश्वती हेल्थ केअरचे संस्थापक डॉ. हनुमंत खामकर यांच्यासह , डिलिजंट नर्सिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेतले . यावेळी तपासणी केलेल्या उपस्थितांना मोफत औषधे व अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. सध्या मान्सून सुरू झाला असुन हा भाग दुर्गम असल्याने या भागात पावसाची संततधार असते. त्यामुळे पावसापासून संरक्षण करण्यासाठी गावातील महिलांना पावसाळी कागद वाटप करण्यात आले.
जनतेने दिलेल्या संधीचे स्वागत करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावात नवनवीन विकास योजना आणणार असुन त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणार आहोत.
पंकज धुमाळ विद्यमान सरपंच पसुरे (ता.भोर)