भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोर : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता बुधवार दिनांक 4 एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला या संपात भोरमधील सर्व डाकसेवक सहभागी झाले. पुणे ग्रामीण भागातील सर्वच डाक सेवक यामध्ये सहभागी झाल्याने टपाल सेवा या दिवशी पूर्णपणे विस्कळीत झाली असल्याचे व संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सचिव एकनाथ मंडलिक यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील डाक सेवकांना किमान आठ तासांचे काम देऊन खात्यात समाविष्ट करणे,पाच लाख ग्रॅज्युएटी करणे , एकशे ऐंशी दिवसांची रजा वाढ , अद्यावत वैद्यकीय सुविधा,पद्दोन्नती मिळणेबाबत अशा या व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा एक दिवसीय संप पुकारला आहे. हा संप करून सुद्धा सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ५ डिसेंबर पासून देशातील सर्व डाक सेवक, कर्मचारी बेमुदत संपावर हे जाणार असल्याचेही जिल्हा ग्रामीण डाक सेवा संघाचे अध्यक्ष वसंत चरेकर यांनी सांगितले.
या एक दिवसीय लाक्षणिक संपात भोर तालुक्यातील तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोळे, सुभाष साळेकर, दत्तात्रय वरे, अशोक कंक ,संतोष बुदगुडे ,यशवंत पवार, अश्विनी शिंदे, संतोष सणस, सुनील साळुंखे, सोमनाथ माळी, कृष्णा बिलवरे, चंद्रकांत डाळ, रामचंद्र दावे, तुषार धुमाळ नवनाथ राठोड, सविता भागवत ,वैशाली जेधे, सुजाता कोंढाळकर, सोहेल मनेर आदीजण सहभागी झाले होते.