भोरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती.
भोर प्रतिनिधी-कुंदन झांजले
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र राज्यभर पुन्हा एकदा आपला दौरा सुरू केला आहे याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भोरला मराठा आरक्षण मागणी मुद्द्यावर रविवार दि.१९ मनोज जरांगे पाटील यांची सभा विद्यानगर शेटे मैदानावर दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली असून एक मराठा लाख मराठा या उपरोक्त प्रमाणे तालुक्यातुन घरा घरातुन हजारो लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याने ही सभा भोरची ऐतिहासिक विराट होणार असल्याचा विश्वास भोर तालुका सकल मराठा संयोजक , आयोजकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भोरला सकल मराठा समाजाची ऐतिहासिक विराट सभा भोर शहरातील विद्यानगर येथील शेटे मैदानावरील १८ एकरात आयोजित केली असून या सभेची पुर्व नियोजीत तयारी झाली असून या सभेच्या ठिकाणी तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी आलेल्या समाज बांधवांसाठी अल्पोपहार, पाणी, सुसज्ज पार्किंग, सभा उशिरापर्यंत चालू राहिल्यास लाइटिंग, तसेच दुरवरून सभा पाहण्यासाठी दोन एलईडी स्क्रीन लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यात गावागावांमध्ये मराठा समाज बांधव सभेला उपस्थित रहावा यासाठी फ्लेक्स बोर्ड ठिक ठिकाणी लावण्यात आले आहे.सभेला येताना कोणत्याही समाजाला त्रास होणार नाही याची खबरदारी घेत सभेच्या ठिकाणी येऊन ही सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन आयोजकांडुन करण्यात आले आहे. सभेच्या ठिकाणी नियोजन ,सुव्यवस्था राखण्यासाठी गावा गावातुन १५० स्वयंसेवक असणार आहेत .हि सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वागत, व्यासपीठ, नियोजन ,आपत्कालीन, सुरक्षा ,आरोग्य , पाणी पुरवठा, बैठक- नोंदणी अशा ११ समित्या नेमल्या आहेत. दोन अग्निशामक बंब,चार रुग्णवाहिका ,रेस्क्यु टीम देखील या ठिकाणी असणार आहेत,तसेच या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष म्हणून देखील उभारण्यात आलेला आहे जेणेकरून कोणतीही अनुचित घटना, अनुचित प्रकार घडल्यास या सर्वांवर तात्काळ नियंत्रण मिळवता येईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले. महिलां- पुरुष स्वतंत्र कक्ष बैठक व्यवस्था केली असून तालुक्यातुन विविध समाज , संघटना ,दानशूर व्यक्तींनी विशेष सहकार्य केले असल्याचे सकल मराठा भोर तालुकाध्यक्ष संजय भेलके यांनी सांगितले. यावेळी सचिव सारंग शेटे, सोमनाथ ढवळे, महेश शेटे,भालचंद्र मळेकर, दिपक शेटे, स्वामी धुमाळ, कुणाल धुमाळ, ओंकार शिवतरे, बाळासाहेब शेटे, एकनाथ रोमण, ॲड.धीरज चव्हाण, महेश भेलके,अमर चव्हाण उपस्थित होते.