भोर :जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे आयोजित विभागीय शासकीय मैदानी स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी,पुणे येथे नुकत्याच पार पडल्या असून स्पर्धेमध्ये श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज नसरापूरच्या अंकिता लक्ष्मण इंगुळकर हिने १९ वर्षाखालील गटात ४०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून तिची राज्य स्पर्धेकरता निवड झाल्याचे प्राचार्य एस. वाय.शिंदे यांनी सांगितले.
राज्यस्तरीय स्पर्धा येत्या २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान बल्लारपूर जि.चंद्रपूर या ठिकाणी संपन्न होणार आहे.
विद्यालयाचे प्राचार्य एस. वाय. शिंदे,पर्यवेक्षक ए. आर.खोपडे,विभाग प्रमुख वाय.एम.मिसाळ, व्यवसाय विभाग प्रमुख एस.एम.मोहिते, क्रीडा शिक्षक व्ही.एस.धेंडे, एस.ए.पुणेकर,टी.डी. माळी,आप्पा सावंत, सुधांशू खैरे,एच.एम. धुमाळ,जी.एम.थोरात तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी इंगुळकर हिचे अभिनंदन केले .